Oct 10, 2021

पुर्णत्व

 तू समुद्राला आलेली 
 एक भरती आहेस 
 जिच्या मुळे येईल एक उधाण 
 जिच्या मुळे होईल माझा विस्तार 
 तुझं येणं मनाला सुखावून जातं 
 मनातल्या भावना उचंबळून येतात 
 भरती सारख्या, 
 मनात सुखाच्या लाटा लहरतात 
 खुप छान छान विचार बहरतात 
 तू आलीस की मनात भरुन येतं 
 तू आलीस की मन खुलून येतं 
 भरतीच तू मन भरुन येणारच 
 नव कल्पना तू देऊन जाणारच 
 खरंच, तू अशीच येत रहा 
 तुझी खुप गरज आहे मला 
 तू येत रहा आणि 
 मला पूर्णत्वास नेत रहा 
          ⓒ गणेश ✍✍
 

12 comments:

  1. खरंच, तू अशीच येत रहा इथून खालच्या ओळी खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर लिहिलंय👌👌👌👌

    ReplyDelete
  3. अप्रतिम रचना...👌👌👌👌👌👌
    बाप्पा जीऽ ...🌷
    खूपच छान 👌.. सुंदर रचना केली आहे..!
    तिच्या शिवाय अपुर्णच ...!
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🙏

    ReplyDelete
  4. खूप छान रचना...येईल लवकरच..👍✍️👌🍫🤚

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मानसी 🌺🌺
      Just imagination 😀😀

      Delete
  5. अतिशय सुंदर रचना ��������

    ReplyDelete
  6. अप्रतिम च नेहमीप्रमाणे 👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  7. अप्रतिम रचना ��

    ReplyDelete
  8. अप्रतिमच 👌👌👌👌

    ReplyDelete

Publish Your Valuable Comments Here

Most Populer Post

खुदा की बंदगी

खुदा की बंदगी का रास्ता जो उसने पाया उसको सुकूं ए रुख़ का अंदाज नज़र आया भटक रहा था वो भी अब तक दर बदर को खुदा के दर पे आ के वो दर्द ...