छान असलेल्या नाते संबंधात जेव्हा वादविवाद होतात, तेव्हा आपला आपणच संयम राखायचा आणि ते छान नातं अबाधित ठेवायचं. या आशयाची कविता.
रागात नात्यामध्ये
टोकाचे वाद होतात
आणि जेव्हा वेळ येते
नातेबंध तुटण्याची
तेव्हा आपणच स्वतःला
आवरायच असतं.
तुटणार् एखाद नातं
सावरायच असतं
कारण आवेशात कांहीही
आपण बोलून जातो
पण नातं तुटल्या नंतर
उरात घाव रहातो
पश्चात्तापाच दूःख
नंतर मन पोळणारच
घडून गेलेलं सर्व
नंतर मनात घोळणारच
म्हणून वेळ जाण्याआधीच
आपण स्वतःला थांबवायचं
आपणच ठरवायचं
माणूस
मिळवायचं की लांबवायचं
आपले आपल्या पासून लांबण्याआधी
आपणच आपलेपणा राखायचा
विषाची चव घेण्यापेक्षा
मधाचा थेंब चाखायचा
गणेश दळवी ✍✍
खूप खूप सुंदर लिहिलंय 👌👌👌👌👌
ReplyDeleteक्या बात है...!!
ReplyDeleteबाप्पा जीऽ....🙏
खूपच छान अप्रतिमच...!👌
नाते जपणे खूप महत्त्वाचे..!!👌
🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹
आबा 🙏
खूपच छान, अप्रतिम च..... 👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteखूप खूप छान 👌🏻👌🏻
ReplyDeleteKhup chaan...,khara aahea..👌👍✍️🍫🌹
ReplyDeleteखूप खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली 👌👌👌
ReplyDeleteखूप सुंदर रचना केली सर 👌👌👌
Deleteछान लिहिलय गणेश दादा
ReplyDeleteमधाचा थेंब... अप्रतिम शब्दगुंफण सरजी!👌👌👌
ReplyDelete