Sep 23, 2021

मधाचा थेंब


छान असलेल्या नाते संबंधात जेव्हा वादविवाद होतात, तेव्हा आपला आपणच संयम राखायचा आणि ते छान नातं अबाधित ठेवायचं. या आशयाची कविता.

रागात नात्यामध्ये 
टोकाचे वाद होतात 
आणि जेव्हा वेळ येते 
नातेबंध तुटण्याची 
तेव्हा आपणच स्वतःला 
आवरायच असतं. 
तुटणार् एखाद नातं 
सावरायच असतं 
कारण आवेशात कांहीही 
 आपण बोलून जातो 
 पण नातं तुटल्या नंतर 
उरात घाव रहातो 
पश्चात्तापाच दूःख 
नंतर मन पोळणारच 
घडून गेलेलं सर्व 
नंतर मनात घोळणारच 
म्हणून वेळ जाण्याआधीच 
आपण स्वतःला थांबवायचं 
आपणच ठरवायचं माणूस 
मिळवायचं की लांबवायचं 
आपले आपल्या पासून लांबण्याआधी 
आपणच आपलेपणा राखायचा 
विषाची चव घेण्यापेक्षा 
मधाचा थेंब चाखायचा 
   गणेश दळवी ✍

9 comments:

  1. खूप खूप सुंदर लिहिलंय 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  2. क्या बात है...!!
    बाप्पा जीऽ....🙏
    खूपच छान अप्रतिमच...!👌
    नाते जपणे खूप महत्त्वाचे..!!👌
    🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹
    आबा 🙏

    ReplyDelete
  3. खूपच छान, अप्रतिम च..... 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  4. Khup chaan...,khara aahea..👌👍✍️🍫🌹

    ReplyDelete
  5. खूप खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली 👌👌👌

    ReplyDelete
  6. छान लिहिलय गणेश दादा

    ReplyDelete
  7. मधाचा थेंब... अप्रतिम शब्दगुंफण सरजी!👌👌👌

    ReplyDelete

Publish Your Valuable Comments Here

Most Populer Post

खुदा की बंदगी

खुदा की बंदगी का रास्ता जो उसने पाया उसको सुकूं ए रुख़ का अंदाज नज़र आया भटक रहा था वो भी अब तक दर बदर को खुदा के दर पे आ के वो दर्द ...