खुप वेळा चुकलो,
मग त्या चुकांतूनच
बरच काही शिकलो.
शिकायला दैवान
खुप काही शिकवलं,
काळाच्या दाढे खाली
मोडलं नाही वाकवलं.
सुख हाती देता देता
दुःख देउन चकवलं,
दिवसा पेक्षा अंधाराच
काळ रुप दाखवलं.
मग त्या अंधारातच
मी
माझं दुःख झाकलं,
झाकलेल्या दुःखाला
त्या अंधारातच टाकलं.
मनाशी पक्कं बांधलं
दुःखात सुख जाणायचं,
एखाद्याच्या आनंदात
आपण आनंद मानायचं.
एखाद्याच्या आनंदासाठी
जाणूनबूजून चुकायचं,
त्याच्या साठी वेळेला
स्वतःलाही मुकायचं.
जगताना असंच
खुप वेळा चुकायचं,
आयुष्य कसं जगायचं
ते चुकांतुनच शिकायचं.
गणेश दळवी ✍✍
अगदी बरोबर... चुकांतूनच शिकायचं... सुंदर रचना
ReplyDeleteधन्यवाद वृषाली जी 🙏🏼
Deleteसुंदर रचनाआदादा,अप्रतिम काव्य👍🌿🌿🌿🌿
ReplyDeleteखूपच छान रचना केली आहे तुम्ही 👌👌
ReplyDeleteमनोबल वाढवणारी रचना...खूप छान👌👍✍️🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteधन्यवाद मानसी 🙏🏼
Deleteअप्रतिम रचना केली सर👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद राजश्री 🙏🏼🙏🏼
DeleteKhup chan lihilay 👌👌👌👌 apratim sandesh
ReplyDeleteखूप सुंदर च लिहिलंय अप्रतिम👌👌👌👌👌👌👌👌
ReplyDelete