Sep 19, 2021

आयुष्याची परीक्षा

आयुष्य जगताना मी 
 खुप वेळा चुकलो, 
 मग त्या चुकांतूनच 
 बरच काही शिकलो. 
 शिकायला दैवान 
 खुप काही शिकवलं, 
 काळाच्या दाढे खाली 
 मोडलं नाही वाकवलं. 
सुख हाती देता देता 
 दुःख देउन चकवलं, 
दिवसा पेक्षा अंधाराच 
 काळ रुप दाखवलं. 
मग त्या अंधारातच 
मी माझं दुःख झाकलं, 
झाकलेल्या दुःखाला 
 त्या अंधारातच टाकलं. 
 मनाशी पक्कं बांधलं 
 दुःखात सुख जाणायचं, 
एखाद्याच्या आनंदात 
 आपण आनंद मानायचं. 
एखाद्याच्या आनंदासाठी 
 जाणूनबूजून चुकायचं, 
 त्याच्या साठी वेळेला 
 स्वतःलाही मुकायचं. 
 जगताना असंच 
 खुप वेळा चुकायचं, 
 आयुष्य कसं जगायचं 
 ते चुकांतुनच शिकायचं. 

      गणेश दळवी ✍✍  

10 comments:

  1. अगदी बरोबर... चुकांतूनच शिकायचं... सुंदर रचना

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद वृषाली जी 🙏🏼

      Delete
  2. सुंदर रचनाआदादा,अप्रतिम काव्य👍🌿🌿🌿🌿

    ReplyDelete
  3. खूपच छान रचना केली आहे तुम्ही 👌👌

    ReplyDelete
  4. मनोबल वाढवणारी रचना...खूप छान👌👍✍️🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  5. अप्रतिम रचना केली सर👌👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद राजश्री 🙏🏼🙏🏼

      Delete
  6. खूप सुंदर च लिहिलंय अप्रतिम👌👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete

Publish Your Valuable Comments Here

Most Populer Post

खुदा की बंदगी

खुदा की बंदगी का रास्ता जो उसने पाया उसको सुकूं ए रुख़ का अंदाज नज़र आया भटक रहा था वो भी अब तक दर बदर को खुदा के दर पे आ के वो दर्द ...