Oct 13, 2021

बायकोसाठी

असं ठरलय का
बायकोने राबायचं
नवय्राने रागवायचं
बायकोने खपायचं
नवय्राने खुपायचं
रागवायचा मक्ता काय
पुरूषांकडेच आहे का,
अहो कीती करायचं तिने
वर तिनेच ऐकायचं,
तो सांगेल तसंच रहायचं,
वर इतकं करूनही
नकळत काही चुकलंच तर
खाल मानेने ओरडण सहायचं,
ती सुद्धा नकळत चुकणारच 
हे आपण का समजत नाही.
का आपण थोडं समजून
तिला पाठीशी घालत नाही.
पहा, अट्टाहास नाही माझा,
पण एवढ करुन पहा.
काही वेळा तिच्या चुकीला
नजरंदाज करून पहा.
कधी कधी म्हणाना,
अग,चालतय ग
त्यात काय एवढं.
तिच्याही मनावरच
ओझं उतरेल पहा केवढं.
तेवढं तरी बायकोचं
मित्र बनून रहाल ना.
मी म्हणतो म्हणून नाही,
बायको साठी
एवढं कराल ना !
पहा जमतय का 

 ©️®️ गणेश ✍✍

8 comments:

  1. व्वा व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली बायकोसाठी ताई नशीबवान आहे 👌👌👌👌

    ReplyDelete
  2. वाह ...मस्तच आज बायको खुश ..गणेश ही रचना सर्वच बायकांना आवडेल अशी आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐

    ReplyDelete
  3. अप्रतिमच 👌👌👌👌

    ReplyDelete
  4. अप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  5. अप्रतिम विचार मांडला दादा 👌

    ReplyDelete
  6. वाहा... वाहा... मीत्रा भारीच लीहिलसरें

    ReplyDelete
  7. खुप सुंदर सामाजिक संदेश देणारी, प्रेरणादायक रचना...��������

    ReplyDelete
  8. वा, वा, खूप चांगला संदेश दिला सर👌👌👌👌

    ReplyDelete

Publish Your Valuable Comments Here

Most Populer Post

खुदा की बंदगी

खुदा की बंदगी का रास्ता जो उसने पाया उसको सुकूं ए रुख़ का अंदाज नज़र आया भटक रहा था वो भी अब तक दर बदर को खुदा के दर पे आ के वो दर्द ...