Oct 25, 2021

साथ असावी

कोणतीही स्त्री स्वतःच्या जोडीदारा कडून काही माफक अपेक्षा ठेवते. त्यातलीच एक म्हणजे, तिच्या जोडीदाराने तिला समजून घ्यावं. जेवढं ती त्याला समजुन घेत असते, त्याचा अर्ध्या पटीने ही जरी पुरूषाने स्त्री ला समजून घेतलं तरी तिच्या मनामध्ये अगदी खरीखुरी साथ मिळाल्याच समाधान असतं. कित्येक वेळा ती स्वतःच्या कर्तुत्वा वर खुप काही असाध्य ते साध्य करू शकते. तेव्हा ही तिला फक्त मानसिक सोबतीची साथ हवी असते. पण काही वेळा तिला साथ तर मिळत नाहीच उलट तिनं पुढं टाकलेलं पाऊल मागे घ्यावं लागतं. अस कोणत्याही स्त्री  बरोबर होणं म्हणजे खुप वाईट प्रसंग म्हणावा लागेल. पण ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे. आणि ही बदलायला हवी. आपण आपल्या मोठ्या होणाऱ्या पीढीला  या बाबतीत योग्य संस्कार देणं गरजेचं आहे. याविषयी आपण नक्कीच कार्यरत राहू, अस मला वाटतं. 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 

                                                        गणेश ✍✍


5 comments:

  1. खूपच सुंदर लिहिलंय छान msg👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐

    ReplyDelete
  2. व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम संदेश दिला

    ReplyDelete
  3. अप्रतिम गणेश दादा

    ReplyDelete
  4. अगदी बरोबर...संसार सुखाचा होण्यासाठी पती-पत्नीने एकमेकांची साथ देण....समजून घेण फार गरजेच असत....👌👍💐🍫

    ReplyDelete
  5. खूप छान लिहिलास अप्रतिम 👌👌👌

    ReplyDelete

Publish Your Valuable Comments Here

Most Populer Post

खुदा की बंदगी

खुदा की बंदगी का रास्ता जो उसने पाया उसको सुकूं ए रुख़ का अंदाज नज़र आया भटक रहा था वो भी अब तक दर बदर को खुदा के दर पे आ के वो दर्द ...