तिला हवं होतं
एक बोलणारं मन
नको होतं तन
नको होतं धन
फक्त हवं होतं
एक बोलणार मन
जे तिला समजून घेईल
जे तिच्याकडे
तिच्या इतकं बोलेल
जे तिला आधार देईल
तिच्या भावनांना समजेल
तिच्या मनातलं त्याला
थोडं तरी उमजेल
फक्त एवढीच काय ती
अपेक्षा होती हो तिची
बघा ना,
एवढी माफक अपेक्षा
जो पुर्ण करून देईल,
तो त्याच्या जोडीदाराचा
किती छान मित्र होईल
असंच आपल्या जोडीदाराला
समजून घेऊया आणि
जमलंच तर त्यांचे
छान मित्र होऊया.
गणेश ✍✍
Vva khup chan lihili apratim tich mn samjun ghetl 👍👍🏅🏅🏅
ReplyDeleteअप्रतिम च.... 👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteअप्रतिम रचनाविष्कार जी!👌👌👌🌟🌟🌟🌟
ReplyDelete